decision of state government: आंतरधर्मीय विवाहावर राज्य सरकारचा मोठा निर्णय

decision of state government: श्रद्धा वालकरच्या हत्येने देशाला धक्का बसला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आंतरधर्मीय विवाहाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती नेमण्यात आली. आंतरधर्मीय आणि आंतरजातीय नोंदणीकृत विवाह, नोंदणी न केलेले विवाह, पळून जाऊन केलेले आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह यांची संपूर्ण माहिती ठेवण्याची जबाबदारी ही समिती असेल. ही समिती मुलींच्या पालकांसह मुलींची भेट घेऊन त्यांच्यात समन्वय साधणार आहे.

मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यांची समिती नेमण्यात आली. महिला व बाल विकास मंत्रालयाचे मुख्य सचिव, आयुक्त, सहसचिव अॅड योगेश देशपांडे, संजीव जैन, सुजाता जोशी, अॅड प्रकाश सालसिंगीकर, यदू गौडिया, मीराताई कडबे, शुभदा कामत, योगिता साळवी आणि महिला व बाल विकास आयोगाच्या उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली.

मुलींच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहांची माहिती गोळा करणे आणि समन्वय साधण्याची जबाबदारी समन्वय समितीवर असेल. संबंधित मुली किंवा त्यांचे कुटुंबीय समन्वय साधण्यास तयार नसतील तर त्यांचे समुपदेशनही समितीमार्फत केले जाईल.

Leave a Comment